Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana 2024
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणसाठी अर्ज आजपासून सुरू, अर्ज करण्यास ‘या’ 15 दिवसांचीच मुदत,अर्ज करा! – Ladki Bahini Yojana Online Apply
महाराष्ट्र सरकार द्वारे राज्यातील महिलांना आर्थिक मदत प्रदान करण्यासाठी एक नवीन योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना 2024. माझी लाडकी बहिन योजनांच्या माध्यमातून राज्याची आर्थिक रूपाने कमजोर वर्गातील महिलांना प्रत्येक महिन्यात 1500 रुपए की आर्थिक सहायता राशि प्रदान केली जाणार आहे.या योजनेच्या अंतर्गत राज्याच्या पात्र महिलांना लाभ देण्यासाठी महाराष्ट्र सरकार माझी लाडकी बहिन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज मागवत आहे.
Majzi Ladki Bahin Yojana Online Apply 2024
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिन्याकाठी महिलांना १ हजार ५०० रुपये मिळणार आहेत. त्यासाठी २१ ते ६० वयोगटातील महिला (वार्षिक अडीच लाख रुपये उत्पन्न मर्यादा) या योजनेसाठी पात्र असणार आहेत. त्यासाठी अर्ज करण्यास आज पासून(सोमवारी) प्रारंभ होणार आहे. पूर्ण महाराष्ट्रातून लाखो भगिनी अर्ज सूरू होण्याची वाट बघत आहे. अजून अर्जाची लिंक सुरू झाली नाही. लिंक आज उपलब्ध होणे अपेक्षित आहे. उपलब्ध झाली की लगेच महाभरती वर उपलब्ध करून देवू.एकट्या सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 14 लाख महिला योजनेच्या लाभार्थी होऊ शकतील अशी स्थिती आहे. महाराष्ट्रतील लाभार्थी सर्व महिलांना योजनेच्या लाभासाठी अडीच लाख रुपये वार्षिक उत्पन्न असल्याचा दाखला काढावा लागणार आहे. लाभार्थी महिलांना 15 दिवसात कधीही त्यांच्या गावातील महा- इ-सेवा केंद्रावर जाऊन अर्ज करता येईल
दरवर्षी 46,000 कोटी रुपये खर्च केले जातील.
महाराष्ट्र सरकार द्वारे ही योजना खास प्रकारे आर्थिक रूपाने कमजोर कुटुंबाची 21 ते 60 वर्षे महिलांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी सुरुवात केली आहे. एकत्र राज्याची महिला आणि आर्थिक स्थिती सुधारून व आत्मनिर्भर आणि सशक्त होऊ शकते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक मदत प्रदान करण्यासाठी सरकारकडून 46,00 कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत .
Majzi Ladki Bahin Yojana Eligibility Criteria
कोणत्या महिला असणार पात्र?
– महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक
– विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, निराधार महिला
– वयाची किमान २१ वर्ष पूर्ण व कमाल ६० वर्ष मर्यादा
– अर्ज करणाऱ्या महिलांचे बँक खाते असणे आवश्यक
– अर्जदार महिलेच्या कुटुंबांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजारांपेक्षा जास्त नसावे
– अन्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दीड हजार रुपयांपेक्षा जास्त लाभ घेतला नसेल
– ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन नावावर नसेल, अशा महिला.
माझी लाडकी बहीण योजनेतून दरमहा १५०० रुपये कोणाला मिळणार ? त्याचा फॉर्म कसा भरायचा
ही कागदपत्रे जोडणे बंधनकारक
ऑनलाइन संकेतस्थळावर अथवा प्रत्यक्ष अर्ज करावा
– आधार कार्ड आवश्यक
– राज्याचे अधिवास प्रमाणपत्र अथवा राज्यातील जन्म दाखला
– बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
– पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशनकार्ड
– योजनेच्या अटी-शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
– अर्ज दाखल करताना अर्जदार महिला प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक
Ladki Bahini Yojana Schedule
– अर्ज करण्याची सुरुवात : १ जुलै
– अर्ज करण्याची शेवट तारीख : १५ जुलै
– प्रारूप निवड यादी प्रकाशित : १६ ते २० जुलै
– प्रारूप यादीवर हरकत, तक्रार करणे : २१ ते ३० जुलै
– लाभार्थी अंतिम निवड यादी प्रकाशित : १ ऑगस्ट
– लाभ देण्यास सुरुवात : 14 ऑगस्टपासून
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana पूर्ण शासन निर्णय (GR) येथे पहा