Maha Forest Recruitment 2023 : वन विभाग भरती 2023

Discover the latest information about Maha Forest Recruitment. Click here for detailed updates and job-related notifications.

वन विभाग भरती 2023 ची सूचना आपल्याला आजच्या लेखात दिली जाईल. या वर्षी वन विभागाने महाराष्ट्रातील विविध संवर्गातील 2417 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज 10 जून 2023 पासून सुरु होत आहे आणि 30 जून 2023 या तारखेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील.

या लेखात आपण वन विभाग भरती 2023 बद्दलची माहिती संपूर्णपणे मिळवू शकता. यात वन विभाग भरती 2023 ची अधिसूचना, महत्वाच्या तारखा, रिक्त पदे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, विवरणीचा उल्लेख आणि ऑनलाईन अर्ज करण्याची संपूर्ण माहिती आहे.

Table of Contents

Maha Forest Recruitment 2023 :वन विभाग भरती 2023

महाराष्ट्रातील वन विभागाने एकूण 2417 पदांसाठी वन विभाग भरती 2023 जाहीर केली आहे. या भरतीच्या संदर्भात उमेदवारांनी 10 ते 30 जून 2023 या कालावधीत ऑनलाईन अर्ज करू शकतात. वन विभाग भरती 2023 च्या संक्षिप्त माहितीसाठी खालील तक्त्याचा अवलोकन करा…

Maha Forest Recruitment 2023 :वन विभाग भरती 2023
विभागवन विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाववन विभाग भरती 2023
पदांची नावे
 • Stenographer (Higher Grade) (लघुलेखक (उच्चश्रेणी))
 • Stenographer (Lower Grade) ((लघुलेखक (निम्नश्रेणी))
 • Jr. Engineer (Civil) (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
 • Sr. Statistics Assistant (वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक)
 • Jr. Statistics Assistant (कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक)
 • Surveyor (सर्व्हेअर)
 • Accountant (लेखापाल)
 • Forest Guard (वनरक्षक)
वन विभाग अधिसूचना 202308 जून 2023
एकूण रिक्त पदे2417
निवड प्रक्रिया
 • ऑनलाईन परीक्षा
 • शारीरिक चाचणी (फक्त वनरक्षक  पदासाठी)
 • कौशल्य चाचणी (काही लघुलेखक पदासाठी)
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख10 जून 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख30 जून 2023
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
वनविभागाचे अधिकृत संकेतस्थळwww.mahaforest.gov.in

 

Maha Forest Recruitment 2023 : वन विभाग भरती 2023 अधिसूचना PDF

वनरक्षक भरती 2023 अधिसूचना PDF: वन विभाग भरती 2023 ची अधिकृत अधिसूचना PDF दिनांक 08 जून 2023 रोजी जाहीर केली गेली आहे. लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, लेखापाल, सर्वेक्षक आणि वनरक्षक पदांसाठी वन विभाग भरती 2023 ची अधिकृत अधिसूचना जाहीर झालेली आहे. पदानुसारच्या पदांसाठी अधिसूचना जाहीर केली गेलेली आहे. सर्व पदांच्या अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Maha Forest Recruitment 2023 :वन विभाग भरती 2023 अधिसूचना

पदाचे नावअधिसूचना PDF
Accountant (लेखापाल)येथे क्लीक करा
Forest Guard (वनरक्षक)
Surveyor (सर्वेक्षक)
Stenographer (लघुलेखक), Statistics Assistant (Junior and Senior) (सांख्यिकी सहाय्यक (कनिष्ठ व वरिष्ठ)), Jr. Engineer (Civil) (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

 

Maha Forest Recruitment 2023: वन विभाग भरती २०२३ महत्वाच्या तारखा

२०२३ ची वन विभाग भरती परीक्षा महाराष्ट्रातील एक महत्वाची भरती आहे. अर्ज करण्यासाठी ऑनलाईन अर्ज लिंक १० जून २०२३ रोजी सक्रीय होईल आणि या भरतीच्या अर्जाची शेवटची तारीख ३० जून २०२३ आहे. ह्या भरतीमध्ये सर्वांच्या लक्षात ठेवलेल्या महत्वाच्या तारखा खालील प्रमाणे आहेत.

वन विभाग भरती 2023 – महत्वाच्या तारखा

कार्यक्रमतारीख
वन विभाग भरती 2023 अधिसूचना08 जून 2023
वन विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख10 जून 2023
वन विभाग भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख30 जून 2023
वन विभाग परीक्षा 2023लवकरच जाहीर करण्यात येईल
वन विभाग निकाल 2023लवकरच जाहीर करण्यात येईल
वनरक्षक शारीरिक चाचणी 2023लवकरच जाहीर करण्यात येईल

 

Maha Forest Recruitment 2023 :वन विभाग भरती 2023 मधील रिक्त पदांची संख्या.

2023 मध्ये वन विभागात विविध रिक्त पदे उपलब्ध असतील. या पदांमध्ये लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, लेखापाल, सर्वेक्षक आणि वनरक्षक यांची भरती सुरु होईल. या सर्व संवर्गांसाठी रिक्त पदांचा विवरण खाली दिला गेला आहे.

Post Name (पदाचे नाव)Vacancy (रिक्त पदे)
Stenographer (Higher Grade) (लघुलेखक (उच्चश्रेणी))13
Stenographer (Lower Grade) (लघुलेखक (निम्नश्रेणी))23
Jr. Engineer (Civil) (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य))08
Sr. Statistics Assistant (वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक)05
Jr. Statistics Assistant (कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक)15
Surveyor (सर्वेक्षक)86
Accountant (लेखापाल)129
Forest Guard (वनरक्षक)2138
Total2417

 

पदानुसार वन विभाग भरती रिक्त पदे 2023 बद्दल माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

वन विभाग भरती रिक्त पदे 2023

Vanrakshak Bharati 2023 : वनरक्षक भरती 2023: अर्ज शुल्क…

अर्ज शुल्क: वन विभाग भरती 2023 अंतर्गत प्रवर्गानुसार लागणारे अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहे.

सर्वसाधारण प्रवर्ग: रु. 1000/-
मागास प्रवर्ग: रु. 900/-
माजी सैनिक: 0/-

Vanrakshak Bharti 2023 : वन विभाग भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष

वन विभाग भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व शारीरिक निकष खाली देण्यात आले आहे.

Vanrakshak Bharti 2023 : Education Qualification शैक्षणिक पात्रता

Post (पदाचे नाव)Education Qualification (शैक्षणिक पात्रता)
Stenographer (Higher Grade) (लघुलेखक (उच्चश्रेणी))
 • माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.
 • लघुलेखनाचा वेग किमान 120 शब्द प्रति मिनिट
 • इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे.
 • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
Stenographer (Lower Grade) (लघुलेखक (निम्नश्रेणी))
 • माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.
 • लघुलेखनाचा वेग किमान 100 शब्द प्रति मिनिट
 • इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
 • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
Jr. Engineer (Civil) (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
 • उमेदवाराने शासनाने मान्यता दिलेली तीन वर्ष कालावधीची स्थापत्य अभियंत्रिकी मधील पदविका किंवा तिच्याशी समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली अशी इतर कोणतीही अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
 • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
Sr. Statistics Assistant (वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक)
 • उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठाची गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी किंवा सांख्यिकी या विषयात पदव्युत्तर पदवी किंवा
 • मान्यता प्राप्त विद्यापीठाची गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी किंवा सांख्यिकी या विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी धारण करणे आवश्यक आहे.
 • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
Jr. Statistics Assistant (कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक)
 • उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठाची गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी किंवा सांख्यिकी या विषयात पदवी धारण करणे आवश्यक आहे
 • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
Surveyor (सर्वेक्षक)
 • उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (12 वी) उत्तीर्ण केलेली असावी.
 • मान्यता प्राप्त संस्थेचे सर्वेक्षक प्रशिक्षण पाठ्यक्रम प्रमाणपत्र धारण केलेले असावे
 • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
Forest Guard (वनरक्षक)
 • उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (12 वी) ही विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
 • अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (10 वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
 • माजी सैनिक असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (10 वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
 • नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा- यांचे पाल्य असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (10 वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
Accountant (लेखापाल)
 • उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणे आवश्यक आहे.
 • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

 

Vanrakshak Bharti 2023 : Age Limit (वयोमर्यादा)

वन विभाग भरती 2023 मधील वनरक्षक पदासाठी आवश्यक वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे.

 • सर्वसाधारण प्रवर्ग: 18 ते 27 वर्षे
 • मागास प्रवर्ग: 18 ते 32 वर्षे

इतर संवर्गातील रिक्त पदांसाठी वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे.

 • सर्वसाधारण प्रवर्ग: 18 ते 40 वर्षे
 • मागास प्रवर्ग: 18 ते 45 वर्षे

Vanrakshak Bharti 2023 :Physical (शारीरक निकष).

मापदंड पुरुष महिला
उंची163 सेमी150 सेमी
छाती79 सेमी (84 सेमी फुगवून)लागू नाही
वजनवैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणातवैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात

 

वनरक्षक पदासाठी उमेदवाराने दूरदृष्टी आणि जवळील दृष्टीचे व विना चष्म्याचे खालील निकष पूर्ण केले असावे.

vanrakshak bharati 2023

Vanrakshak Bharati 2023: वन विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?

ऑनलाईन अर्ज लिंक: वन विभागाची 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक आज दिनांक 10 जून 2023 रोजी सक्रिय झालेली आहे. या वन विभागाच्या 2023 साठीच्या भरतीसाठी, आपल्याला ऑनलाईन अर्ज करायची अंतिम मुदत 30 जून 2023 आहे. ऑनलाईन अर्ज करण्याच्या प्रक्रियेसाठी, आम्ही तुम्हाला खालील वन विभागाची 2023 साठीची ऑनलाईन अर्ज लिंक प्रदान करतोय.

Vanrakshak Bharti 2023

वन विभाग भरती 2023

Apply Online  

 

Vanrakshak Bharti 2023 :वन विभाग भरती 2023च्या ऑनलाईन अर्ज कसा करावा? 

Vanrakshak Bharti 2023, वन विभागाने 2023 साठीच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज कसे करावे ह्याचे सर्व स्टेप्स खाली दिले आहे.

 • सर्वप्रथम वन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळ @mahaforest.gov.in
  तिथे भरती प्रक्रिया या टॅब वर क्लीक करा.
 • आता नवीन पेज ओपन होईल. तेथील ऑनलाईन लिंक वर क्लीक करा
 • To Register समोरील क्लिक हिअर वर क्लीक करा.
 • आता ऑनलाईन फॉर्म ओपन होईल.
 • सर्व माहिती योग्यरित्या भरा.
 • अर्ज शुल्क भरा व अर्जाची प्रिंट काढून घ्या….

Vanrakshak Bharti 2023 :वन विभागाच्या परीक्षेचा स्वरूप 2023 वन विभागाच्या परीक्षेचा स्वरूप 2023

Vanrakshak Bharti 2023 च्या अंतर्गत उमेदवारांनी ऑनलाईन लिखित परीक्षा घेण्यात येणार आहे. स्पर्धात्मक लिखित परीक्षा टी.सी.एस. आयओएन (टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस लिमिटेड) ने घेण्यात येईल. या परीक्षेत मुख्यतः मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयांवर प्रश्न विचारले जातील. वन विभागाच्या परीक्षेचा स्वरूप 2023 संबंधित संपूर्ण माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

 वन विभागाच्या परीक्षेचा स्वरूप २०२३

वन विभाग भरती 2023ची निवड प्रक्रिया निवड प्रक्रिया: वन विभाग भरती 2023च्या अंतर्गत विविध पदांची भरती केल्या जातील आणि पहिल्या वेळी ऑनलाईन परीक्षा होईल. नंतर वनरक्षक पदासाठी शारीरिक चाचणी घेण्यात येईल. वन विभाग भरती 2023च्या निवड प्रक्रियेच्या टप्प्यांची यादी खालीलप्रमाणे आहे.

 • ऑनलाईन परीक्षा
 • शारीरिक चाचणी (वनरक्षक पदासाठीची)
 • कौशल्य चाचणी (लघुलेखक पदांसाठीची)
 • कागदपत्र तपासणी वैद्यकीय चाचणी…

Leave a Comment