Anganwadi Sevika Bharati 2023
Ichalkaranji Anganwadi Sevika Bharati 2023, Anganwadi Sevika. Anganwadi Sevika Bharati 2023 ( Anganwadi Bharati 2023) for 69 Anganwadi Sevika posts .
Ichalkaranji Anganwadi Sevika Bharati 2023 (कोल्हापूर अंगणवाडी भरती )बाल विकास प्रकल्प अधिकारी कोल्हापुर (नागरी) या कार्यालयातर्गंत कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील अंगणवाडी मदतनीस पदसंख्या ६९ या मानधनी पदासाठी स्त्री उमेदवार भरतीकरीता अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज सादर करण्यासाठी अटी व शर्ती खालील प्रमाणे निश्चित करणेत आलेल्या आहेत.
Anganwadi Sevika पदाचे नाव : अंगणवाडी मदतनीस
Anganwadi Sevika (शैक्षणिक पात्रता): अंगणवाडी मदतनीस पदासाठी १२ वी उत्तीर्ण (राज्य शिक्षण मंडळ / त्यास समकक्ष) अशी किमान शैक्षणिक पात्रता आवश्यक राहील
Anganwadi Sevika(मानधन): शासकिय नियमानुसार 4425/- दरमहा
Anganwadi Sevika (वास्तव्याची अट):- ज्या नगरपरिषद क्षेत्रात मदतान पद रिक्त आहे. (इचलकरजा, हुपरी ) त्या नगरपरिषद क्षेत्रातील रहिवाशी असलेल्या उमेदवारांना पात्र समजण्यात येईल. स्थानिक रहिवाशी असलेबाबत शासनाने निश्चित केलेला पुरावा आहे. (उदा. मतदान ओळखपत्र, आधारकार्ड, रेशनकार्ड सत्यप्रत जोडावी. तसेच स्थानिक रहिवाशी असलेबाबत स्वंयघोषणापत्र आणि तहसीलदार यांचे domicile प्रमाणपत्र आवश्यक सोबत जोडणे सादर करणे बंधनकारक राहिल.)
Anganwadi Sevika (वयाची अट): वयोमर्यादा १८ वर्षे ते ३५ वर्षे राहील (विधवा उमेदवारासाठी ही मर्यादा कमाल ४० अशी राहील.)
उमेदवाराचे किमान व कमाल वय हे अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकास म्हणजे 30/06/2023 दिनांकास गणन्यात येईल.
Anganwadi Sevika (लहान कुटूंब): लहान कुटूंब अट लागू करण्यात येत आहे ती खालील प्रमाणे राहिल
- लहान कुटूंब याचा अर्थ दोन जिवंत मुले यासह पत्नी व पती (आई, वडील, सासु, सासरे इ. यासह) असा आहे.
- सदर नियम आमलात आल्याच्या दिनांकपुर्वी दोन हयात | अपत्य असून तिसरे अपत्य झाल्यास सेवेतून काढून | समजण्यात येईल. मुल / अपत्य यामध्ये दत्तक घेतलेल्या एखाया सेविका / मदतनीस यांच्या पतीचे निधन झाल्यास अथवा कायदेशीर दुसरे लग्न केल्यास दुस-या पती पासून होणा-या टाकण्यात येईल नंतरच्या एकाच प्रसुतीत जन्मलेल्या
कोणत्याही एकापेक्षा अधिक मुलांना एकच अपत्य मुलांचा/मुलीचा समावेश होणार नाही. दोन अपत्यापर्यंत सुट देण्यात येईल.
Anganwadi Sevika (अनुभव):
अंगणवाडी सेविका / मदतनीस /मीनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी २ वर्षाचा अनुभव ग्राहय धरणेत येईल. ( सक्षम प्राधिका-याचे प्रमाणपत्राची साक्षाकित प्रत सोबत जोडावी.)
Anganwadi Sevika (भाषेचे ज्ञान):-
ज्या अंगणवाडी केंद्रा करीता सेविकेची / मदतनीसची नियुक्ती करावयाची आहे अशा अंगणवाडी मध्ये ५०% पेक्षा जास्त मुले मराठी भाषा व्यतिरीक्त इतर भाषा (उदा. उर्दू, हिंदी, माडीया गॉड, कोकणी, पावरी, कन्नड, तेलगु, भिल्लोरी, बंजारा एक भाषा) बोलणारी असतील तर अशा अंगणवाडीमध्ये इ. पैकी सेविका / मदतनीस यांच्या पदावर येथून पुढे सदर भाषेचे ज्ञान असलेल्या (लिहता व वाचता येणे )सेविका / मदतनीस म्हणून नेमणूक करण्यात येईल . तथापि अशा उमेदवारानी इयत्ता १२ वी अथवा परिशिष्ट -अ मध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हतेपैकी किमान एक अर्हता मराठी भाषा विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक राहील.
Anganwadi Sevika (विधवा व अनाथ उमेदवाराबाबतीत):
१. शासकीय संस्थेत रहात असलेली विधवा (स्थानिक
२. शासकीय अनुदानीत संस्थेत रहात असलेली विधवा
३. इतर विधवा महिला (पतीचा मृत्यूचा दाखला)
४. शासकीय संस्थेत रहात असलेल्या अनाथ मुली ५. शासन अनुदानीत संस्थेत रहात असलेल्या अनाथ मुली.
अनं क्र १,२,४ व ५ करीता संबधीत जिल्हयाचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र आवश्यक
राहील.
Anganwadi Sevika (बदली):
गणवाडी कर्मचारी हे एकाकी पद असलेने तसेच ती स्थानिक रहिवाशी असावी या केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचना विचारात घेता अंगणवाडी कर्मचा-यांना बदलीचे कोणतेही प्रावधान राहणार नाही.
Anganwadi Sevika (मागास प्रवर्ग): अनुसुचित जाती/ अनुसुचित जमाती / इतर मागास प्रवर्ग / विमुक्त जाती/ भटक्या जमाती / अर्थिक दष्टया दुर्बल घटक / विशेष मागास प्रवर्ग या उमेदवारांने सक्षम प्राधिका-याचे प्रमाण पत्राची साक्षाकिंत प्रत सोबत जोडावी.
Anganwadi Sevika प्राथमिक यादी : अर्ज स्वीकारण्याच्या शेवटच्या दिनांकापासून १५ दिवस (कार्यालयात नोटीस बोर्ड वर प्रसिध्द करण्यात येईल)
Anganwadi Sevika यादीस हरकत : दिनांक कार्यालयात / नोटीस बोर्डवर प्रसिध्द झाल्यापासून पुढील १० दिवस दिनांक
निवड प्रक्रिये विरूध्द तक्रार / अपिल:
१. प्राथमिक गुणानुक्रमे यादीतील कोणत्याही उमेदवाराची वैयक्तीक माहिती खोटी असल्याची तक्रार असल्यास यादी प्रसिध्द झाल्यापासून १० दिवसाच्या आत बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय कोल्हापूर- इचलकरंजी, नगरपरिषद शॉपिंग सेंटर, २ रा मजला, जनता चौक, मेन रोड, इचलकरंजी – ४१६९९५ यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार करावी. त्यानंतर प्राप्त झालेल्या तक्रारीची कोणत्याही परिस्थितीत दखल घेतली जाणार नाही.
२. निवड यादी घोषित झाल्यापासून ३० दिवसाच्या आत मा. विभागीय उपायुक्त, महिला व बाल विकास, पुणे विभाग, पुणे यांच्याकडे अपिल दाखल करता येईल
कागदपत्रांच्या प्रती: अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या प्रती सक्षम प्राधिका-याने साक्षांकीत केलेल्या असाव्यात. (साक्षांकन राजपत्रीत अधिकारी, माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य यांचे असावे.)
निवड प्रक्रिया :
शासन निर्णयात नमुद केल्याप्रमाणे उमेदवाराच्या शैक्षणिक गुण पत्रीकेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे ७५ गुण व अतिरिक्त २५ गुण. (विधवा / अनाथ – १० गुण, अनुसूचित जाती / जमाती – १० गुण, इतर मागास प्रवर्ग / विमुक्त जाती/ भटक्या जमाती / अर्थिक दृष्टया दुर्बल/विशेष मागास प्रवर्ग-०५ गुण, अंगणवाडी सेविका / मदतनिस पदाचा ०२ वर्ष अनुभव असल्यास ०५ गुण)
पत्र व्यवहार : भरती प्रक्रियेसंबधी अर्जदारास कोणताही पत्रव्यवहार केला जाणर नाही. सर्व | सुचना जाहिराती मधील अटी व शर्ती प्रमाणे असून वेळोवेळी सुचना कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावण्यात येतील.
अंगणवाडी निवड : नगरपरिषद निहाय अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर गुणानुक्रमानुसार अंगणवाडी मदतनिस यांची निवड केली जाईल. व गुणक्रमानुसार अंगणवाडी देण्यात येईल. त्यामुळे नगरपरिषद कार्यक्षेत्रातील कोणत्याही अंगणवाडी वरती काम करावे लागेल व त्यांना प्रवास भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
Anganwadi Sevika अर्ज सादर करणेचा अंतिम दिनांक : 30 जून 2023 सायंकाळी 6.00 पर्यत
सूचना : अर्ज खालील पत्यावर समक्ष बंद पाकीटात दयावेत. पोस्टाची दिरंगाई अथवा इतर
कोणत्याही कारणा वरून अंतिम दिनांका नंतर अर्ज स्विकारले जाणार नाहित याची नोंद घ्यावी.
Anganwadi Sevika सदर अर्ज सादर करणेचा पत्ता – बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय कोल्हापूर- इचलकरंजी, नगरपरिषद | शॉपिंग सेंटर, २ रा मजला, जनता चौक, मेन रोड, इचलकरंजी – ४१६११५
जाहिरात (Notification) & Offline अर्ज: पहा