How to Prepare for MPSC Interview :MPSC Interview ही महाराष्ट्र राज्यातील एक प्रतिष्ठित स्पर्धा परीक्षा आहे. या परीक्षेत मुलाखत हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. मुलाखतीत उमेदवाराची शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक योग्यता तपासली जाते. MPSC मुलाखतीत यशस्वी होण्यासाठी चांगली तयारी आवश्यक आहे.
How to Prepare for MPSC Interview यशस्वी होण्यासाठी खालील गोष्टींची तयारी करणे आवश्यक आहे
वैयक्तिक माहिती
MPSC मुलाखतीत उमेदवाराची वैयक्तिक माहिती, शिक्षण, अनुभव, कौशल्ये याबद्दल विचारले जाते. त्यामुळे या सर्व गोष्टींची काळजीपूर्वक तयारी करणे आवश्यक आहे.
सामान्य ज्ञान
MPSC मुलाखतीत उमेदवाराच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेतली जाते. त्यामुळे चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, राजकारण, अर्थशास्त्र, विज्ञान इत्यादी विषयांचे सामान्य ज्ञान असणे आवश्यक आहे.
वर्तन
MPSC Interview (मुलाखतीत) उमेदवाराचे वर्तन देखील महत्त्वाचे असते. त्यामुळे मुलाखतीत योग्य वर्तन करणे आवश्यक आहे.
मुलाखतीबाबत कोणताही दबाव न घेता आत्मविश्वासपुर्वक सामोरे जावा. थोडीसी भिती सहाजिक आहे. परंतु त्याचा परिणाम होऊ देऊ नका. अधिकारी हा कितीही मोठे संकट/अडचण आली तर त्यांना सामोरे जाणारा असायला हवा.
मुलाखतीपर्यत आपण एक अधिकारी आहात या भावनेने रहा. त्यापध्दतीने तुमचे बोलणे, वागणे, राहणे असायला हवे. त्यामुळे आत्मविश्वास वाढतो. तुमची Body Language बनते. उस्फुर्तपणे इतरांशी बोला. Formal dress वापरा. इतरांशी नम्रतापूर्वक सवांद साधा
माझे मुख्य परीक्षेला ऐवढी मार्क आहेत. मला खुप मोठी मार्काची आघाडी आहे. माझी Post Fix आहे या अविरभावात राहुन मुलाखतीकडे दुर्लक्ष करू नका. मुलाखतीची तयारी पण sincerely करा. त्याचप्रमाणे मला मुलखतीला किमान एवढे मार्कस मिळायला पाहिजेत तरच मला अमुकअमुक post मिळेल असे ठोकताळे पण मांडू नका. त्यामुळे उगीच दबाव येतो त्यामुळे मुलाखतीसाठी नैसर्गिक खेळी करता येत नाही .
MPSC Interview मुलाखतीची तयारी करताना काही अतिरिक्त टिपा उपयुक्त ठरू शकतात:
- MPSC Interview विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादी तयार करताना, विविध विषयांचा समावेश करा. यामध्ये चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, राजकारण, अर्थशास्त्र, विज्ञान, वर्तमानपत्रे आणि मासिके, सामाजिक विषय इत्यादींचा समावेश असावा.
- या प्रश्नांची उत्तरे तयार करताना, आपल्या भाषेचे स्पष्ट आणि संक्षिप्त असणे महत्त्वाचे आहे. आपण आपल्या उत्तरांमध्ये विशिष्ट उदाहरणे आणि आकडेवारी देखील समाविष्ट करू शकता.
MPSC Interview मुलाखतीत यशस्वी होण्यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवा:
- मुलाखतीला वेळेपूर्वी पोहोचा.
- मुलाखतीत योग्य वेशभूषा करा.
- मुलाखतीत स्पष्ट आणि संक्षिप्त उत्तरे द्या.
- मुलाखतीत आत्मविश्वासाने बोला.
MPSC Interview मुलाखतीपर्यत तुम्ही तुमच्यातील काही कमतरता दुर करु शकता
- हात वरे जास्त होत असतील
- बोलताना अडखळत असाल
- चेहऱ्यावर हास्य येत नसेल (हास्य यायलाच हवे असे नाही परंतु nervous नसावे.)
- मुलाखतीच्या दरम्यान होणारी तुमची अतिरीक्त हालचाल.
MPSC Interview : Official Site
MPSC Interview (मुलाखतीची) तयारी करताना प्रथम तुमचा Biodata चांगला Prepare करा.
त्यामध्ये…
१]तुमचे गाव – वैशिष्ट्ये, समस्या, समस्येचे सोडवणूक
२]तुमचा जिल्हा – वैशिष्ट्ये, समस्या, समस्येचे सोडवणूक
३]आई-वडिलाबद्दल माहिती
४]तुमची शैक्षणिक पार्श्वभुमी
५]पदवीबद्दलची सद्य स्थिती
६]सदया करत असलेला Job
७] तुमचे छंद , आवड
Biodata वर अधारीत प्रश्न
१]तुम्ही कोठून आलात ?
२[तुमचे 11 वी 12 वीला विषय कोणते होते ?
३]BAMS ला कोणते विषय होते?
४]सोलापूर जिल्ह्याची पर्जन्यक्षमता किती आहे ?
५]सोलापूर जिल्ह्याची सिंचनक्षमता किती आहे ?
६]पर्जन्यवृष्टी कमी असताना सिंचन क्षमता जास्त का?
७]वडिल काय करतात ?
८]Forensic science च्या काही term
९]सध्या काय करता?
Factual प्रश्न
मुलाखतीमध्ये मोठ्या प्रमाणावर factual प्रश्न विचारले जातात. त्या सर्वच प्रश्नांची उत्तरे यायलाच हवी असे काय नाही. कधी कधी तुम्हाला comfort करण्यासाठी असे प्रश्न विचारले जातात. तुमच्या knowledge ची परीक्षा अगोदरच झालेली आहे याचे भान असावे.
उदा. मुलाखतीमध्ये I.C.S. या परिक्षेचा longform विचारला होता? या प्रश्नाचे उत्तर मला देता आले नाही.
सर्वच प्रश्नांची उत्तरे यायलाच हवेत असे काही बंधन नसते त्यामुळे त्याचे tension घेऊ नका मुलाखतीला विचारलेल्या पहिल्याच प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येत नसेल तर ते द्यायलाच हवे असा नियम नाही. सॉरी सर मला माहित नाही असे आत्मविश्वासपुर्वक सांगु शकता.
भारतीय राज्यघटनेतील तत्वाशी तुमची किती बांधिलकी आहे हे पण मुलाखतीमध्ये वेगवेगळ्या प्रश्नांच्या अधारे विचारले जाते. त्यामध्ये जात, धर्म, लिंग, प्रदेश, आरक्षण,मुलभूत अधिकार,मुलभूत कर्तव्ये इत्यादी याबाबत प्रश्न विचारले जातात.
MPSC Interview Preferences
# तुम्ही जे Preferences टाकलेले आहेत.ते काळजीपूर्वक टाका आणि त्याचा क्रम तुम्हाला माहित असायला हवा. त्याचप्रमाणे त्याच क्रमाने का टाकले? याचे उत्तर देता आले पाहिजे? उदा. काही जण DySp हे पद Deputy Collector या पदा अगोदर टाकतात तर प्रथम का ते दिले ? हे सांगता आले पाहिजे.
कोणत्याही प्रश्नाचे उत्तर थोडक्यात देण्याचा प्रयत्न करा आणि जो प्रश्न विचारला आहे त्याला अनुसरूनच उत्तर द्या. प्रश्न काय विचारला आहे ? काळजीपूर्वक ऐका. तुम्ही प्रश्न किती एकाग्रपणे ऐकता हे पण बघितले जाते. काही वेळेस खुप मोठा प्रश्न विचारला जातो. त्यामुळे एकाग्र राहण्याची सवय लावा. सद्या तुमच्याशी कोण बोलत असेल तर काळजीपूर्वक दुसर्याचे मनने ऐकून घ्या . उत्तर देताना घाई करू नका
MPSC Interview Mock Test Practice
मुलाखतीची पुर्व तयारी म्हणून mock interview जरूर द्या. त्यामुळे तुम्हाला तुमच्या चुका कुठे होतात ते लक्षात येते. त्या चुका पुढील mock मध्ये कमी करता येतात परंतु mock पण देऊ नका. Mock interview चांगल्या, अनुभवी तंज्ञाकडेच द्या.
- मॉक इंटरव्ह्यूचा सराव करताना, आपल्याला विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्यास आणि आपल्या वर्तनाचे मूल्यांकन करण्यास मदत होईल. आपण मॉक इंटरव्ह्यूचा सराव करण्यासाठी मित्र, कुटुंबातील सदस्य किंवा कोणत्याही व्यावसायिक प्रशिक्षकाची मदत घेऊ शकता.
- MPSC मुलाखत ही बोलण्याची परीक्षा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त बोलण्याचा सराव करा. वाचणापेक्षा बोलणे जास्त महत्वाचे आहे. त्यामुळे पुढील काही दिवस कोणताही प्रश्न घ्यायचा आणि स्वतःशी तुमच्या मित्राशी, तुमच्या शिक्षकांशी याबाबत उत्तर सांगायचा प्रयत्न करा
मुलाखतीमध्ये तुमची नेतृत्वक्षमता, कार्यतत्परता, आत्मविश्वास , प्रामाणिकपण, निर्णय घेण्याची क्षमता, सामाजिक जाणीव,देशाबद्दलची बांधिलकी, सामाजिक बांधिलकी, तुमच्या विचारातील ठामपणा, संघभावना, हजरजबाबीपण, समकालीन प्रश्न सोडविण्याची कुवत, दुरदृष्टीपण. चौफेर व्यक्तिमत्व, Sympathy and Empathy या बाबी तपसल्या जातात .
मुलाखत ही तुमच्या व्यक्तीमत्वाची कसोटी आहे कोणत्याही परिस्थीतीत खोटे बोलू नका ‘ Honesty Is best Policy’ मुलाखत घेणारे खुप अनभुवी तज्ञ असतात. खोटे पकडले जाऊ शकते त्याची खात्री ते वेगळ्या प्रश्नाव्दारे करतात.
शेवटपर्यत उत्साही, आत्मविश्वासू, सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा. तुमच्या बोलण्यात स्पष्टपणा, भारदारपण ठेवण्याचा प्रयत्न करा. मुलाखतीमध्ये वशिला चालतो अशा फालतू विचारापासून दूर राहा,स्वत:वर विश्वास ठेवा. सर्वांना मुलाखतीसाठी खुप साऱ्या शुभेच्छा. All the Best…!